प्रेम ते हेच का
प्रेम ते हेच का
मनाअंतरंगी रंगून जाणे
जागेपणी हि स्वप्न पाहणे
हवी हवी भावना, गोड संवेदना
हलचल कसली हि मनामध्ये
कोणी सांगेल का
प्रेम ते हेच का, प्रेम ते हेच का
मी जाईजिथे तुला पाहितिथे
आभास हा कि तू आहे तिथे
नकळत माझ्या हृदयावरती
तू राज्य केलेस का
प्रेम ते हेच का, प्रेम ते हेच का