ऐक ना जरा तू
ऐक ना जरा तू
मन माझे काय बोले
ऐक ना जरा तू
धड धड या हृदयाची
ऐक ना जरा तू
सारी सृष्टी तीच तरी हि नवी वाटू लागे
फुलणाऱ्या या पाकळ्यांना नवे पण आले
कुजबुज या पाखरांची
ऐक ना जरा तू
रुणझुण प्रीत पैंजणांची
ऐक ना जरा तू
वाट पाहत होती नजर हि ज्याची
चाहूल आता कुठे जरा लागे त्याची
एकट्याश्या या हृदयाला आपुले कोणी मिळाले
भावनेच्या मधुसुमनांना शब्दगन्ध आले
सरगम या प्रेमाची
ऐक ना जरा तू
नवी धून या गाण्याची
ऐक ना जरा तू