स्वतःसाठी एवढं नक्की करा part 1
तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती कोण असा प्रश्न पडला आहे का?
आजच स्वतःला विचारा कि तुमची सर्वात जवळची तुमची आवडती व्यक्ती कोण?
आई ,बाबा, बहीण ,भाऊ, बायको ,नवरा ,मित्र ,मैत्रीण वैगरे असे जर तुमचं उत्तर असेल तर ते चुकीचं आहे .तुम्ही चुकीचा विचार करताय .यातील कोणतीही व्यक्ती तुमची जवळची, तुमची आवडती असू शकते पण त्याआधी आणखी एक व्यक्ती जी तुमच्या खूप जवळची आहे ,जिला तुम्ही खूप चांगले ओळखता .ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः हो तुम्ही स्वतः कसे आहात ,कोण आहात.तुमचे चांगले वाईट गुण ,तुमचा स्वभाव .हे जेवढं तुम्हाला स्वतःला माहित असत तेवढं कोणालाही माहित नसत. त्यामुळे स्वतःला महत्व द्या .
स्वतः साठी थोडा वेळ द्या .स्वतःला ओळखा.
स्वतःची आवड निवड ओळखा आणि ती आवड जपा .
तुमच्यातील गुण अवगुण ओळखून सकारात्मक व्यक्तिमत्व घडावा .
तुमच्या भावनांचा आदर करणारे तुम्हाला तुमच्या चांगल्या वाईट काळात तुम्हाला साथ देणारे विश्वासू मित्र निवडा .
स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपा .
जॉब,करिअर निवडताना स्वतःच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा नक्की विचार करा .
स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा .