पैसा
पैसा
पैसा पैसा पैसा
कैसा हा पैसा
साऱ्या दुनियेत न कोणी ऐसा
ऐसा हा पैसा ||
कधी लक्ष्मीचे रूप होते जे धन
गुंतू लागला माणूस तिला मोहिनी मानून
धन होते कधी सुखाचे साधन
माणूस झाला आता पैश्याच्या अधीन
माणुसकीला आला शून्याचा मान
आणि पैसाच झाला भगवान
निर्धन सुंदरी दिसू लागली कुरुपवाणी
घनिष्ठ नकटी नार भासते राजसवाणी
पैशाविना न कोणाचे कोणी
पैशाने केली दुनिया दिवाणी
पैसाच करतो साखर पेरणी
पैशाविना ऐकू येति फक्त कडवट बोलणी
नाती गोति न समजती कोणा
पैशाने विकत घेतल्या भावना
कर्तव्य आणि प्रेम हि विसरवितो हा पैसा
माणूस नाचतो तसा पैसा नाचवतो जसा
पैसा पैसा पैसा आणि फक्त पैसा