तू ऊठ चाल पुढे
तू ऊठ चाल पुढे……..
चालत राहणे हा नियम सृष्टीचा ॥
नाही खचणार तू
नाही पडणार तू
काळासी तुडवूनी
पुन्हा उठणार तू
प्रारंभ करी तू प्रवास नव्या जीवनाचा
तू ऊठ चाल पुढे…..
चालत राहणे हा नियम सृष्टीचा॥
वाहा नदी होऊनी
डबक्याला नाही मोल
वाया न घालावी
जन्म तुझा अनमोल
घे मिठीत हा नवतेज नव्या सूर्याचा
तू ऊठ चाल पुढे……
चालत राहणे हा नियम सृष्टीचा ॥
HI