
वाट पाहुनी का नाही थकले
दोन किनारे पापण्यांचे
गोठलेल्या भावनांना
भरते आले आठवांचे॥
निरभ्र शुभ्र आकाश सारे
कुठुन अचानक ढग दाटले
थांबत नाहीत सरी बरसती
अजुनी समुद्र का नाही आटले ॥
घन निळ्या त्या आठवांचे
धुमसत होते अंतरात जे
कठीण,निष्ठुर पाषाण जरी
क्षणात कसे ते घन विरघळले॥
