तुझ्याविना
हजार स्वप्ने, हजार दिशा
पूर्ण झाल्या सर्व आशा
परि सुने सुने आहे जग माझे अंतरीचे……
तुझ्याविना ॥
ऋतू प्रेमाचा पावसाळी
आठव तुझा, हृदय जाळी
राहिले ते नाते अधुरे जन्मांतरीचे…..
तुझ्याविना ॥
फुल ही भासे,जसे काटे
तुजविण हे जगणे व्यर्थ वाटे
ऐश्वर्य ही वाटे शून्य विश्वाअंतरीचे ……
तुझ्याविना ॥