स्त्रीत्व

ती जननी, ती भगिनी,

तीच असे संवर्धिनी॥

ती पत्नी, ती कामिनी,

तीच तुझी सहचारिणी ॥

अखंड ब्रम्हांडी तिचेच तत्त्व

जगदंबेचे तिच्यात सत्व ॥

जप मानवा तिचे स्त्रीत्व

जिच्यामुळे तुझे अस्तित्व ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *