पिवळे पान

पिकलेल्या पानाची

सय कुणाला येते

मन हे मलमलि

हिरवळीच्या मागे जाते

सृष्टीचा नियम हा

पिवळे पान गळते

पाहुनी पडताना त्याला

हिरवे पान हसते

असतो त्याचा ही इतिहास

हे न कुणाला कळते

वेळ सरल्यावरी

मागुनी ते उमगते

खंत ही त्या पक्वतेची

पाऊल न मागे येते

हिरवाई ही अंतराने

पिवळे पणास जाते

चार दिसाची ही नवलाई

ऐट नवा मिरविते

जुन होताच ती

पिवळाइत गुदमरते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *