भगवंत
चुकले होते काही कर्म
शिक्षा दिली का म्हणून
तुझ्या पायी जीव माझा
मज सर्व काही मान्य
सु-कर्माची झाली जाण
तेव्हा मज उमजले
माझ्या मनाच्या कुपीत
तुझे आगमन झाले
देहाने मी नाही आलो
आज विठू तुझ्या वारी
पण मन माझे आहे दंग
तुझ्याच गजरी
आज धन्य झालो मी
भाग्यवंत वारकरी
विठू भेटायासी आला
माझ्या मनाच्या गाभारी