दिवस नवा
उदयापासूनी अस्ताकडे,
प्रवास असतो सूर्याचा ॥
क्षणा क्षणांनी गुंफत जातो,
हार नव्या दिवसाचा ॥
उत्साह नवा अन उमेद नवी ,
घेऊनी येते उषा ॥
विसाव्याची गोड निद्रा, पापण्यात स्वप्नाचे मोती
रुजवूनी जाते निशा ॥
पहाट असते सुरवात ज्याची ,
संध्या असते शेवट त्याची ॥
झाले गेले विसरूनी सारे
सुरुवात करावी नव्या दिवसाची ॥