ग्रहण
प्रेमाचे ते भास सारे,
लढत राहिले माझ्याशी
वादळातून नाव जेव्हा,
पोहोचत होती तीरासी
पैलतीर गाठण्या,
झगडत राहिले काळाशी
काळोखी रात्र संपता ,
ग्रहण लागले सूर्यासी
ज्याच्यासाठी आले होते ,
तोडूनी नाते जगाशी
त्यालाच न किम्मत कळली माझी ,
मग कसले भांडण देवाशी