ये ना तू आकस्मित
आठवणी येती जाती तुझ्या
येत नाही तू कधीच
न परतीच्या वाटेवरुनी ये ना तू आकस्मित ॥
खूप झाले झुरणे आता
खूप स्वतःला सावरणे
मनात नसताना ही
स्मित चेहर्यावर पांघरणे
पहा शोधूनि माझ्याकडे येण्याचा रस्ता
मिळेल तुला कदाचित
न परतीच्या वाटेवरूनी ये ना तू आकस्मित ॥
तूच ये ना एकदा
तुझ्या येण्याचा संदेश घेऊनी
मोडलेला डाव सावर
पुन्हा नव्याने रंग भरूनी
पहा एकदा परत फिरूनी
होईल प्रेमाची जीत
न परतीच्या वाटेवरूनी ये ना तू आकस्मित ॥