शुभ्र हा निशिगंध
शुभ्र हा निशिगंध, दरवळतो माझ्या दारी
मुग्ध ,मंद, सुगंध आणतो, याद प्रियाची न्यारी ॥
आठवात मन गुंग होऊनी, अलगद मिटती पापण्या
अन
विसावतो जीव तेथे क्षणभर, स्वप्न नव्याने गुंफण्या॥
स्वप्नी गर्क होता प्रियाच्या, सारेच विसरते तेव्हा
अन
उभी ठाकते आकस्मित स्वारी भानावर येते जेव्हा॥