जरी किनारे दोन समांतर
चाहूल तुझी चोर पाऊली
हळुवार अलगद भासली
अन मनी तिच्याही अस्तित्वाची
जाणीव नव्याने जागली ॥
समीरा सम तुझी प्रतिमा
जरी दिसत न्हवती तिला
अर्थ नव्याने तुझ्या असण्याचा
कळला होता तिला ॥
जुने पुरावे सांभाळूनि मग
चालत राहीली ती निरंतर
कृष्ण सरिता जुळली होती
जरी किनारे दोन समांतर ॥