हात तुझा दे ना कृष्णा
छायेत तुझ्या होतो तेव्हा
निश्चिंत बागडत होतो मी
विसरलो जेव्हा तुला कृष्णा
भवनदीत कोसळलो मी ॥
विसंगती घडली मजला
झालो आंधळा बहिरा मी
ऐकू कसे तव नाम कृष्णा
शोधू कुठे तुला मी ॥
दमलो फिरूनी सारी सृष्टी
कुजलो या संसारी मी
कुठे अससी सांग कृष्णा
एकदाच तुला पाहीन मी ॥
शोध घेता घेता तुझा
भांबावून पुरता गेलो मी
खूण ती मज दाव कृष्णा
ओळख पटवून घेईन मी ॥
मायेच्या या सागरामध्ये
आहे गटांगळ्या खातो मी
हात तुझा दे ना कृष्णा
नेशील तिकडे येतो मी ॥
hi