चिंब पाऊस आणि तुझी सोबत
चिंब पावसाची रात ,तुझी सोबत तशात
आला बहर प्रितीला, विसरले मी जगाला
काळजाचा ठाव माझ्या, मला नाही लागत
कसे आवरावे त्याला, येत नाही ना हातात
हात घेऊनी हातात, फक्त चालतच राहावे
इथे आपणच दोघे आणि कोणीही नसावे
तुझ्या बाहुत येऊनी,मी मला विसरले
अंग अंग शहारले, मन माझे बहरले
जग इथेच थांबवे,असे काही तरी व्हावे
एकमेकाच्या कुशीत सारे जीवन सरावे