काही शब्द असतात अबोल

काही  शब्द असतात अबोल ,

कुठेतरी खोल मनाच्या भिंतीवर ,

कुणीतरी याव आणि शोधाव त्यानाही ,

दडलेले असतात जे आयुष्याच्या पलीकडे,

जाणून घ्याव त्यांना अन

मारावी फुंकर अगदी अलवार,

सतत सलत असलेल्या त्या शब्दांना,

विसावण्यासाठी क्षणभर,

अन घ्यावे चुंबन त्यांचे 

                  सुखावण्यासाठी मनभर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *