स्वतः साठी हे नक्की करा-part 2
स्वतः साठी हे नक्की करा.
SELF MOTIVATED असणं गरजेचं आहे का ?
प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते .जेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो .
कधी कुणाचा financial loss होतो , job जातो ,एखादी जवळची व्यक्ती आयुष्यातून निघून जाते ,कुणाला नात्यांमध्ये धोका मिळतो. अशी बरीच कारण आहेत कि ज्यामुळे अगदी छान चाललेलं आयुष्य एका क्षणात पूर्णपणे बदलून जात.अशावेळी काहीच सुचत नाही आणि आपण खचून जातो . अश्यावेळी आपण आधारासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीचा शोध घेतो .त्यांना भेटतो त्यांच्याशी बोलतो, कधी कधी ती व्यक्ती आपल्याला समजून घेते, आपलं समाधान करते, आपल्याला त्या परिसस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते .खूप नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते .
पण त्यांचं काय ज्यांच्या आयुष्यात त्यांना समजून घेणारी अशी कोणतीच व्यक्ती नसते.किंवा कधी कधी परिसस्थितीच अशी असते कि आपण कोणाशी बोलू शकत नाही किंवा त्या परिसस्थितीतून आपल्याला कुणीच बाहेर काढू शकणार नाही .अशावेळी दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा करण्यापेक्षा, त्याच परिसस्थित गुरफटून न जाता .स्वतःला थोडा वेळ द्यावा ,थोडा वेळ शांत बसून विचार करावा,थोडं मागे वळून पहाव .आपल्याच आयुष्यात आपण अश्या अनेक प्रसंगातून स्वतःला बाहेर काढलेलं असत .जर त्यावेळी आपण अशा प्रसंगांतुन स्वःताला बाहेर काढलेलं असेल तर आताही आपण यातून बाहेर पडू शकतो, जरी यावेळी परिसशीति खूप कठीण असेल तरीही .हा असा आत्मविश्वास स्वःताला द्यावा .स्वःताच स्वतःचा आधार होण्याचा प्रयत्न करावा .जे लोक self motivated असतात ते मनाने खूप strong होतात. कोणत्याही परिसस्थितीत असे लोक खचून जात नाहीत .आयुष्यात येणारे चढ उत्तर ते अगदी सहज पार करतात . ज्याना मानसिक दृष्ट्या मजबूत बनायचं आहे त्यांनी SELF MOTIVATED असणं खूप गरजेचं आहे.