मोहोर
तुझ्या येण्या ने माझे सारे क्षण हे सजले
पावसाळी इंद्रधनू रंग रंग उधळे ||
मंद धुंद वारा, रेशमी शहारा
निळी गर्द रात आणि तोच शुक्र तारा ||
जीवनी हा नवा कुणाचा मोहोर पसरे
का खुणावे मोहिनी तुझी मला ना कळे ||
स्वप्न ते गवसले ,होते जे हरवले
क्षण क्षण वेचूनि मी प्रीत हार गुंफले ||
पाहिले होते स्वप्न जे मी जाहले ते खरे
पाहुनि या मनि ख़ुशी चंद्र तोही जळे ||
Amazing !
👍🙏