मन वेड असत
मन वेड असत ..
जगाच्या नियमात असो वा नसो
त्याला आवडेल ती गोष्ट करत
कधी इथे तर कधी तिथे असत
हव्या त्या वेळी हव तिथ फिरत
कारण मन वेड असत
वर्तमान विसरून कधी भूतकाळ आठवत
कधी भविष्याची खोटी स्वप्न रंगवत
आयुष्य कसं ही असो
स्वप्नातलं जग हे त्याच असत
तिथेच ते आपल्या मर्जीचे आयुष्य जगत
कारण मन वेड असत
माया, प्रेम अन आपुलकीच्या नावाखाली
वेळो वेळी फसत
आणि तरी ही ते प्रेम करत
कारण मन वेड असत