नवी दिशा
नवी दिशा

जगण्याची सापडली मज नवी दिशा
मनि माझ्या मोहरली नवी मनीषा ||
मन गुंग ,धुंद हे होते
बेधुंद होऊनि उडते
गुज शोधण्या सुखाचे या
पाऊल अंबरी पडते
त्या चांदण्यांच्या चमकण्याची हि वाट पाहे निशा
जगण्याची सापडली मज नवी दिशा
मनि माझ्या मोहरली नवी मनीषा ||
वाटेत हजारो काटे
मज सोबती तेच वाटे
मला वेड आहे यशाचे
हि वेगळी झिंग वाटे
जगावेगळी हि झिंग आहे नि वेगळी हि नशा
जगण्याची सापडली मज नवी दिशा
मनि माझ्या मोहरली हि नवी मनीषा ||