गाव माझे रुसू लागले

पुढे पुढे जाता जाता,

मन मागे पडू लागले ॥

नव्या क्षणांना कवेत घेता,

गाव माझ रुसू लागले ॥

मना-क्षणांची झुंज लागली,

सतत तेवत होती ज्वाला ॥

बाहेर होती नीरव शांतता ,

वादळ अंतरी घुमू लागले ॥

कालसाठी आज ही गमावले ,

आता त्याला कळू लागले ॥

काकुळतीला आले हे मन ,

सरण जेव्हा दिसू लागले ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *